लोकसत्ता टीम

नवी मुंबई: खासगी बसेस मधून होणाऱ्या अवैध वाहतुकिला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओकडून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक १६ मे ३० मे पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून या अंतर्गत अवैध माल वाहतूक, वाहन विमा, वाहन योग्यता प्रमाणपत्र, विना परवाना असलेल्या खासगी बसवर कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसात १२ खासगी बसवर कारवाई केली आहे. अशी माहिती वाशी उपप्रादेशिक परीवहनाने दिली आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ

आजही शहरात काही वाहने परवाना, फिटनेस, इन्शुरन्स, व पीयुसी नसताना नियमबाह्यपणे चालविली जात आहेत. अनेकदा खासगी बसमधून प्रवासी वाहतुकीबरोबर व्यसायिक मालवाहतुकही केली जाते. खासगी बसेस या प्रवासी वाहतुकीसाठी असून मालवाहतुकीसाठी त्याचा वापर करणे नियमात नसताना ही अनधिकृतरित्या मालवाहतूक केली जाते. आरटीओकडून वर्षभर यावर कारवाई सुरूच असते, मात्र तरीही जैसे थेच परिस्थिती पहावयास मिळते. त्यामुळे परिवहनाने जाहीर केलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत शहरातील अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दि.१६मे ते दि. ३०मे दरम्यान विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई सुरू राहणार आहे. आत्तापर्यंत दोन दिवसात नवी मुंबई शहरातील महामार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या १२ बसवर कारवाई करून प्रत्येकी ६० हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पुढेही अवैध वाहतूक आढळल्यास परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली आहे.

आणखी वाचा- नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कचा प्रवेश महागणार; प्रवेशासाठी स्मार्ट कार्डही देण्याचे नियोजन

रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने दोन आठवडे शहरात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये अवैध माल वाहतूक , वाहन विमा,वाहन योग्यताप्रमाणपत्र, विना परवाना, पीयुसी नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत १२ बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. -हेमांगी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी