नवी मुंबई: दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांची संख्या वाढत आहे. विशेषतः दुभाजकाला वाहन धडकने, नियंत्रण सुटणे, यामुळे वाहन अपघात वाढले आहेत. यामध्ये दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांवर वचक ठेवून, वाहन अपघात कमी करण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने आरटीओकडून ८ दिवसांपासून खासगी बस, शालेय वाहने यांची तपासणी सुरू आहे. दोषी आढळल्यास नशेबाज चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
यंदा राज्यात विविध महामार्गावर बस अपघातांची संख्या वाढत आहे. चालकांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने, अतिवेगाने अपघात होत आहेत. काही ठिकाणी बस चालक दारूच्या नशेत बस चालवित असल्याचे प्रकार ही समोर आले आहेत. त्यामुळे हे वाढणारे अपघात टाळण्यासाठी परिवहन कार्यालयाने आरटीओला भरधाव, अतिवेग, ड्रिंक अँड ड्राईव्ह वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा… उरण: चिरनेर परिसरातील नाल्यात मृत मासे; नाल्यात दूषित पाणी सोडल्याची शक्यता
अनुषंगाने वाशी आरटीओने गेल्या आठ दिवसांपासून ही कारवाई सुरू केली असून आत्तापर्यंत ७५ बसेसची तपासणी करण्यात आली आहे . मात्र अद्याप एकही दोषी आढळला नसून त्याच बरोबर शालेय बस चालकांची देखील तपासणी सुरु आहे, अशी माहिती वाशी उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.