पनवेल : पनवेल रेल्वेस्थानकाच्या परिसरात गुरुवारी रात्री ८ वाजता एका संशयीत बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या फोनने पोलिसांची एकच धावपळ उडाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पनवेल रेल्वेस्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी साडेनऊ वाजेपर्यंत बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॅगची तपासणी केली. बॅगेमध्ये कपडे असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – उरणच्या पाणथळीवर पक्षी, खाद्याच्या शोधात पक्ष्यांची भ्रमंती वाढली

हेही वाचा – जेएनपीए सेझच्या भूखंड लिलावांना उत्तम प्रतिसाद, १०४ एकर भूखंडांचे वाटप

पनवेल शहर पोलिसांना आलेल्या फोनवर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या संशयीत बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी तातडीने रेल्वेस्थानक परिसरात धाव घेतली. पनवेल शहर पोलिसांसह वाहतूक पोलीस, पनवेल रेल्वे पोलीस असे विविध पोलीस पथके घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर बॅग ठेवलेल्या परिसरात प्रवाशांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. बॅग ठेवल्यापासूनचा १० ते १५ फूट परिसर निर्जन करण्यात आला. काही मिनिटांत तेथे बॉम्ब शोध पथक पोहोचले. या पथकाने संशयीत बॅग तपासली. या बॅगेत कपडे असल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. तोपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumor of a bomb in an abandoned bag near panvel railway station ssb
Show comments