कोणतीही आपत्ती सांगून येत नाही मात्र आपत्ती ओढवलीच तर तातडीने कोणत्या उपाययोजना करायच्या तसेच आपत्ती येऊच नये यासाठी कशी खबरदारी घेता येईल,  याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून  नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह शहरात विविध ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत प्रात्यक्षिक घेऊन नागरिकांना आपत्तीतील सुरक्षितेचे धडे दिले आहेत.

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने,अग्निशमन विभागाच्या सहयोगाने मुख्यालयात तसेच नमुंमपा शाळा क्र.४ सीबीडी बेलापूर, सिवूड्स ग्रॅंड सेंट्रल मॉल नेरूळ, हॉटेल तुंगा वाशी, डी मार्ट सेक्टर १० ए ऐरोली, जुई शेरनिटी सोसायटी सेक्टर ८ घणसोली अशा विविध ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम वयात आपत्ती निवारणाविषयी जागरुकता निर्माण करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी दिल्या. एखाद्या आपत्तीची महिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी पोहचून कार्यवाही सुरु करण्याचा महापालिका अग्निशमन विभागाचा रिस्पॉन्स टाईम सरासरी एक ते दीड मिनिट आहे. 

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

हेही वाचा >>>भूसंपादनासाठी सिडकोकडून अधिसूचना जाहीर; उरण तालुक्यातील ९०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या घरांवर टांगती तलवार

नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी ही अग्निशमन दलाची ओळख आहे. अग्निशमन दलाला कमीत कमी काम करावे लागावे म्हणजेच नवी मुंबई शहर आपत्तीविना सुरक्षित रहावे ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी असून प्रात्यक्षिकात सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचे अनुकरण सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी नमूद केले. यावेळी सहाय्यक केंद्र अधिकारी  देविदास देशमुख यांनी आगीच्या विविध प्रकारांची माहिती दिली व ती लागू नये म्हणून घ्यावयाची खबरदारी याची माहिती दिली. आग लागल्यानंतर काय काळजी घ्यावी व कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी देखील त्यांनी विस्तृत माहिती दिली. सीबीडी बेलापूर अग्निशमन केंद्र अधिकरी  जे.टी.पाटील यांनी आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फराळ करताना तसेच फटाके उडविताना घ्यावयाची खबरदारी याबाबत महिती दिली. याप्रसंगी आग, पूर, भूकंप, वादळ, रासायनिक व औद्योगिक आपत्ती याविषयीच्या माहितीपटांचे प्रक्षेपण करण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात आग विझविण्यासंबंधी प्रत्यक्षिके करण्यात आली.