नवी मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. परंतु एपीएमसी बाजारात आता टोमॅटोची आवक वाढत असल्याने हळूहळू दर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे . तर दुसरीकडे कांद्याच्या दरात मात्र किंचितशी वाढ होताना दिसत आहे. घाऊक बाजारात कांदा टोमॅटोच्या दरात चढ-उतार पहावयास मिळत असली तरी किरकोळ बाजारात मात्र चढ्यादरानेच विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारावर नियंत्रण कोणाचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व शेतमालाचे दर नियंत्रणाखाली राहावे म्हणून एपीएमसी बाजार समिती अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने घाऊक दरांवर वचक ठेवला जातो. कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने कांद्याचे दर गडगडतील या भीतीने सर्व स्तरातून त्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासन घाऊक बाजारात दाखल होणाऱ्या शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवते, मात्र तोच भाजीपाला किरकोळ बाजारात गेल्यानंतर दुप्पट ते तिप्पट दराने विक्री केला जातो. यावर मात्र कोणाचाही वचक, नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळत नाहीच शिवाय सर्वसामान्यांनाही आर्थिक झळ बसत आहे.

हेही वाचा… जेएनपीटी साडेबारा टक्केची बैठक रद्द, प्रकल्पग्रस्तांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार?

एपीएमसी बाजारात शुक्रवारी राज्यातील टोमॅटोची आवक वाढली आहे. २० ते २५ गाडीवरून शुक्रवारी बाजारात ३७ गाड्या टोमॅटोची आवक झाली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या घाऊक दरात आणखीन ८ रुपयांची घसरण झाली असून कमीत कमी १० ते जास्तीत जास्त २० रुपये किलोने टोमॅटो विक्री होत आहे. मात्र दुसरीकडे तेच किरकोळ बाजारात मात्र ४० ते ५० रुपये किलोने दराने विक्री केले जात आहे. तसेच घाऊक कांदा बटाटा बाजारात कांदा प्रतिकिलो १९-२५ रुपये आहे, तेच किरकोळ बाजारात १०-१५ रुपये अधिक दराने विक्री होत असून प्रतिकिलो ३५-४० रुपयांनी विक्री होत आहे. किरकोळ बाजारात चढ्या दराने विक्री होत असून यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ग्राहकांना मात्र लुटले जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of onion and tomato at double price in retail market dvr