नवी मुंबई : महायुतीच्या जागा वाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात गेल्याने एक पाऊल मागे जावे लागलेल्या नवी मुंबईतील गणेश नाईक कुटुंबियांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आत्तापासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काहीही झाले तरी ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवायची असा चंग गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र माजी आमदार संदीप यांनी बांधला. वेळ आलीच तर लोकसभेचा सांगली पॅटर्न बेलापुरात राबविण्याची तयारी या पिता-पुत्रांनी सुरु केल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरु झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघावर नाईक यांचे लहान पुत्र आणि पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष संदीप यांनी दावा सांगितला असून रविवारी झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी ते बेलापूर या उपनगरांमध्ये त्यांच्या समर्थकांनी जोरदार असे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. एरवी खैरणे एमआयडीसी येथील क्रिस्टल हाऊस येथील कार्यालयात वाढदिवस साजरा करणारे संदीप यांनी यंदा मात्र वाढदिवसाचे ठिकाण सीबीडी बेलापूर येथील पक्षाच्या कार्यालयात हलविले होते. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून संदीप यांचा उल्लेख बेलापूरचे भावी आमदार असाच केला जात होता हे विशेष. सांगली लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुटल्यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिंकली होती. सांगलीत काँग्रेसचे संपूर्ण संघटन विशाल यांच्या विजयासाठी मेहनत घेताना दिसला. बेलापूरमध्ये भाजपने पुन्हा मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी दिली तर अपक्ष रिंगणात उतरण्याची तयारी संदीप नाईक यांनी केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून यापूर्वीच संदीप यांनी पक्ष संघटनेवर आपल्या समर्थकांची वर्णी लावली आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना पक्षाचे संघटन आपल्या बाजूने राहील याची पुरेपूर आखणी संदीप यांच्या गोटात केली जात असून बेलापूरचा हा ‘सांगली पॅटर्न’ भाजप श्रेष्ठींसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – शिंदे गटाकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांचे लक्ष्य भाजपच
नाईकांसाठी आर-पारची लढाई ?
नवी मुंबईपासून थेट मीरा-भाईदरपर्यंत पसरलेल्या जुन्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर काही दशके गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व राहिले होते. २००९ मध्ये विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर नवी मुंबई शहरात ऐरोली आणि बेलापूर असे दोन स्वतंत्र मतदारसंघ तयार झाले. या निवडणुकांमध्येही नाईक कुटुंबाचे वर्चस्व दिसून आले. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत मात्र बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांना भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याकडून अडीच हजार मतांनी निसटता पराभव सहन करावा लागला. २०१९ मध्ये नाईक भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर ऐरोली विधानसभेची एकमेव जागा त्यांना देण्यात आली. अनेक दशके नवी मुंबईतील राजकारणावर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या नाईकांना पहिल्यांदाच दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली. शहरातील एकमेव जागा मिळाल्याने ऐरोलीचे तत्कालीन आमदार संदीप यांना आपल्या वडिलांसाठी ही जागा सोडावी लागली. यावेळी मात्र काहीही झाले तरी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरायचेच असा चंग संदीप यांनी बांधला असून गेल्या महिनाभरापासून बेलापूर मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांचा धडाका त्यांनी लावला आहे.
वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन
बेलापूर मतदारसंघात गेली दहा वर्षे मंदा म्हात्रे या आमदार असून त्यांना तिसऱ्यांदा येथून पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या गणितात नवी मुंबईतील किमान एक मतदारसंघ तरी आपल्या पक्षाला मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते करत असले तरी भाजपच्या विद्यमान आमदाराची जागा या पक्षाला सहजासहजी मिळणे कठीण दिसते. नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपला सुटतील असे चित्र दिसत असले तरी बेलापूरमध्ये या पक्षातच उमेदवारीवरुन जोरदार संघर्ष पहायला मिळत असल्याने हा मतदारसंघ नाईकांसह म्हात्रे यांच्यासाठीही प्रतिष्ठेचा ठरु लागला आहे. भाजपचे विद्यमान शहर अध्यक्ष आणि माजी आमदार संदीप यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी त्यांच्या समर्थकांनी सीबीडी, बेलापूर येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यानिमित्ताने गेला आठवडाभर संपूर्ण मतदारसंघात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला सन्मान सोहळा आयोजित करत संदीप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. वाढदिवस सोहळ्यासाठी देखील आपल्या खैरणे एमआयडीसी येथील कार्यालयात न थांबता सीबीडी येथील कार्यालयाची निवड संदीप यांनी केली होती.
हेही वाचा – शेकाप प्रमुखांच्या कुटुंबात उमेदवारीवरून कलह, दोन भावांमध्ये बाचाबाची
भाजप श्रेष्ठींवर दबाव ?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पिछेहाट सहन करावी लागल्यामुळे भाजप नेते विधानसभा निवडणुकीपूर्वी कमालीचे सावध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील दोन्ही जागांवर दावा सांगत नाईक कुटुंबियांनी भाजप श्रेष्ठींवर दबाव वाढविण्यास सुरुवात केल्याची चर्चाही रंगली आहे. बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्यापेक्षा आपल्या समर्थक माजी नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथून पक्षाने उमेदवारी देताना योग्य उमेदवार निवडावा असा सूर संदीप नाईक समर्थकांनी लावण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी बेलापूरमधून रिंगणात उतरणारच असा पवित्रा संदीप यांचे समर्थक जाहीरपणे घेताना दिसत आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी भाजप नेते महेश बालदी यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीचे दाखलेही नाईक समर्थक बेलापुरात देऊ लागले आहेत.