रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी नवी मुंबईत स्वच्छता अभियान राबिवण्यात आले. या अभियानास शिवाजी चौक व रेल्वे स्थानक परिसरातून सुरुवात करण्यात आली, एकूण आठ विभागांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानामध्ये प्रतिष्ठानचे
३ हजार ७०० सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी नवी मुंबईतील मुख्य व अंतर्गत रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक परिसर स्वच्छ केला. यावेळी जमा झालेला ३७ टन कचरा नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुभ्रे क्षेपणभूमीत जमा करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेसाठी लागणारी यंत्रे व स्वच्छता सामुग्री प्रतिष्ठानने पुरविली.
आणखी वाचा