सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका या दोन्ही सरकारी संस्थांची हस्तांतरण प्रक्रीया पार पडल्यानंतरही सफाई विभागातील कामगार विनावेतन पाच महिन्यांपासून राहील्याने कामगारांना बुधवारी मुंबई येथील आझाद मैदानात जाऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. हिन्द मजदूर किसान पंचायत ही संघटना ९२ सफाई कामगारांचे नेतृत्व करीत असून या संघटनेने लेखी निवेदनात राज्याच्या मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांना ९२  कामगार मंत्रालयासमोर आत्महत्या करतील असा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कॉंक्रीटरस्त्याच्या गतिरोधकावरील डांबर वाहून गेले

हिन्द मजदूर किसान पंचायत समितीने मुख्यमंत्र्यांसह पनवेल पालिकेचे आयुक्त, सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात पाच महिन्यांपासून विनावेतन कामगारांचे हाल झाल्याची माहिती दिली आहे. सिडको मंडळ आणि पनवेल पालिका यांच्यामध्ये १० मार्चला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नागरी सेवा हस्तांतरणाचा करार झाला. पनवेल पालिका आयुक्त आणि सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरी या करारावर आहेत. परंतू करारामधील मुद्यांविषयी अर्थ अन्वयार्थ सरकारी अधिकारी काढत असल्याचा मोठा फटका सफाई कामगारांना मागील ५ महिन्यांपासून सहन करावा लागत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईत घरफोडी, धान्यांचे डबे रिकामी करत सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

पनवेल पालिका क्षेत्रातील सिडको उद्यानाचे विविध भूखंडांपैकी काही भूखंड वगळता सिडकोने अद्याप पालिकेला भूखंड हस्तांतरण न केल्याने पालिकेने जेवढे उद्याने हस्तांतरण केलीत अशाच उद्यानांवरील कामगारांना वेतन देण्याची तयारी दर्शविली आहे. सहा महिन्यांमध्ये ३० जूनपर्यंत नागरी सेवा हस्तांतरण कराराप्रमाणे भूखंड पालिकेला मिळणे अपेक्षित होते. मात्र सिडकोकडून भूखंड हस्तांतरणात टाळाटाळ होत असल्याने पालिकेने ९२ पैकी ७३ कामगारांना वेतन देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली. पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बुधवारी मुंबई येेथील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्धार केल्याची माहिती हिन्द मजदूर किसान पंचायत समितीचे सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitation workers likely to protest at azad maidan in mumbai after not getting salary from five months zws