लोकसत्ता टीम
उरण: चॅलेंजिंग २४ तास अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी मरीन लाईन परिसरातील मुंबई विद्यापीठाच्या मैदानात पार पडलेल्या स्पर्धेत उरण तालुक्यातील चिरनेरच्या संकेत ठाकूर याने सलग बारा तास धावत ७३ किलोमीटरचे अंतर पार केले. ४०० मीटरच्या धावपट्टीवर त्याने १८९ फेऱ्या पूर्ण केल्या.
संकेत हा श्री महागणपती मित्रमंडळाचा पदाधिकारी आहे. त्याने सलग १२ तास न थांबता धावून, ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यात त्याने १२ तासात ७३ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता सुरू झालेली ही स्पर्धा रविवारी सकाळी ७.३० वाजता पूर्ण झाली. यापूर्वी संकेत ठाकूरने अनेक मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.