नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर ५ या भागात राहणारे जाधव कुटुंबीय नवरात्री निमित्त देवीच्या पुजेसाठी गुजरात येथे गेले होते. हि संधी साधत अद्यात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून दागिने व रोकड असा पावणे तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. सानपाडा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. भगवानदास जाधव हे सानपाडा सेक्टर ५ बालाजी सोसायटीत राहतात.

वडिलांच्या नावे असलेली पूजा करण्यास गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील सदरपूर येथे गेले होते. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रीला काळूआईची पुजा करत असतात. काळूआईच्या पुजेसाठी १ ऑक्टोबर रोजी जाधव कुटुंबिय गुजरात येथे गेले होते. यादरम्यान जाधव यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली. ६ तारखेला पूजा व अन्य धार्मिक विधी  आटोपून आल्यावर त्यांना या बाबत कळले. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Story img Loader