संतोष जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संस्था : संत शिरोमणी कलामंच, नवी मुंबई</strong>

नवी मुंबई शहराचा सांस्कृतिक ओलावा निर्माण करण्यासाठी ज्या संस्थांचे मोलाचे योगदान आहे, त्यात संत शिरोमणी कलामंचचे नाव घ्यावे लागेल. बालनाटय़ाचे बीजारोपण करण्याचे काम गेली २४ वर्षे या संस्थेने केले आहे. १९९६ पासून आजपर्यंत कार्यशाळेतून तयार झालेल्या कलाकारांबरोबरच १२२ बालनाटय़ांची निर्मिती झाली. शिबिरातून कलाकार घडले आहेत. संस्था लवकरच रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणार आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी, सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरे पवळे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने १ जानेवारी १९९४ रोजी संत शिरोमणी कलामंच, नवी मुंबई या संस्थेची स्थापना झाली. भालचंद्र माने, प्रशांत सोरटे, किरण होणमोत, विक्रम पाटील, सूरज शिरावले, किरण महाडिक, प्रकाश ढवळे, रुपाली वाघमारे, प्रियंका गांगुर्डे, नम्रता, संचना यांच्या साथीने नाटय़ कलेतून कलेचे विविध आविष्कार साकारत संस्था बालनाटय़ासाठी सदैव झटत आहे. १९९६ मध्ये बालनाटय़ अभिनय कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले. शहरातील रा. फ.नाईक, नवी मुंबई हायस्कूलसह विविध शाळांतून अभिनयाची आवड निर्माण करणारे कलावंत संस्थेने घडवले. तेव्हापासून विनामूल्य बालनाटय़ कार्यशाळा उपक्रम सुरूच ठेवला. उन्हाळी व दिवाळी सुट्टीत बालनाटय़ शिबिराचे वर्ग भरवून कलाकार घडविण्याचे काम सरू होते. १९९६ पासून आजपर्यंत कार्यशाळेतून तयार झालेल्या कलाकारांबरोबरच १२२ बालनाटय़ांची निर्मिती झाली. संत शिरोमणी कलामंच व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद,नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णुदास भावे येथे नवी मुंबईतील बालकलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असलेले बालनाटय़ शिबीर भरवले. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या अभिनय, कला शिबिराचे उद्घाटन व समारोप बालकलाकाराच्या हस्तेच करण्यात येतो. २०१५ पासून शिबिरातून कला व अभिनयात यशस्वी झालेल्या कलाकाराला एकलव्य पुरस्काराने सन्मामित करण्यात येते.

रौप्यमहोत्सवी वर्षांत महाबालनाटय़ाचे प्रयोग

अभिनय व कला शिबिरांचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश कलेला वाव मिळावा, कलाकाराची निर्मिती व्हावी, नाटय़रसिक तयार व्हावेत.  संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत महाबालनाटय़ाचे प्रयोग नावीन्यपूर्ण करण्याचा रंगकर्मी श्रीहरी पवळेंचा मानस आहे.

संस्थेतून घडलेले कलाकार

संस्थेच्या विनामूल्य बालनाटय़ शिबिरातून, विविध कार्यशाळांमधून अभिजित आवारी (चित्रपट), कांचन सुर्वे (भरतनाटय़म), अशिमिक कामठे (मराठी बाणा, सांगत्ये ऐका),राहुल अहिरे (शॉर्टफिल्म) रविराज (जाहिरात), हितार्थ सावंत (तू माझा सांगाती मालिकेत ज्ञानेश्वर), ओमकार कोळपकर, ओमकार वंडेकर (सूत्रसंचालन), अशोक महापूरकर (नाटक, चित्रपट), किरण पाटील (संगीत तंत्रज्ञ), शीतल बतकर (नाटक, चित्रपट, शॉर्टफिल्म, निर्माती), पूजा डोके (जाहिरात तंत्रज्ञ), जगदीश शेळके, देवा सरकटे (मेकअप आर्टिस्ट) घडले आहेत.