ऋतू कोणताही असो, चहा हे चवदार पेय म्हणून नावाजलेले आहे. चहाची पसंती पूर्वापार आहे. थंड वा गरम असो, चहा तसा सर्वानाच प्रिय आहे. उत्साहवर्धक वाटण्यापलीकडे चहाचे अनेक फायदे आहेत. संशोधनानुसार चहा पिण्यामुळे आरोग्य तर सुधारतेच. दातांच्या संरक्षणाबरोबरच कर्करोगावर नियंत्रणही राहते. सगळे नॉन हर्बल चहा हे कॅमेलिया सायनेसिस या चहाच्या जातीच्या झाडाच्या पानापासून बनविले जात नाही. वाशी सेक्टर-२ येथील ‘सरवणा स्नॅक्स’ येथे ही खासियत गेली कित्येक वर्षे जपली जात आहे.

सरवणा पिल्लेई हे तामिळनाडूतील तिरुनेलवेल्ली इथली. घरची बेताची स्थिती असल्याने जेमतेम शिक्षण घेऊन ३० वर्षांपूर्वी मुंबई गाठली. सुरुवातीला अनेक हॉटेलात कामे केली; पण काही केल्या जम बसेना. म्हणून मग तिने ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. गावी तांब्याच्या भांडय़ातील चहाची परंपरा येथे सुरू करून दहा वर्षांपूर्वी वाशी येथे चहाचा धंदा भाडय़ाच्या जागा घेऊन सुरू केला. तांब्याच्या भांडय़ातील ठेवलेले पाणी हे आरोग्यदायी म्हणून समजले जाते. त्यामुळे त्यात उकळवलेले पाणी, दूध चहासाठी वापरले जाते. येथील चहासाठी वापरली जाणारी चहापत्ती ही खास तामिळनाडू येथून मागविण्यात येते. १००० किलो चहापत्ती महिन्याला लागते. रोज ४० लिटर दूध, पाच किलो एवढा राबता असतो. येथे बनवला जाणारा चहा हा लाइव्ह तयार करून मिळतो. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजेनुसार चहातील साखर आणि दुधाचे प्रमाण उपलब्ध होते. खास तामिळनाडूची खासियत म्हणून त्यांनी तामिळनाडूतील आठ कामगार ठेवले आहेत. बस आगाराजवळच असलेले सिनेमागृह या परिसरात असणारी महाविद्यालयांची संख्या त्यामुळे आपसूकच ग्राहकांची गर्दी येथे असते. येथे मिळणारी कॉफीही पितळाच्या वाटीत ‘सव्‍‌र्ह’ केली जाते. लेमन टी, उकळलेला चहा, मलाई चहा, ग्रीन टी येथे मिळतात. हॉलिक्स, बूस्टही मिळते. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून चहाबरोबर तामिळनाडू स्पेशल नाश्त्याचीही सोय असते. इडली, मेदूवडा, मसाला डोसा, गोलभजी, उत्तपा, गुळगुळा आदी पदार्थ येथे खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. गावची खासियत मुंबईत खवय्यांना चाखता यावी यासाठी तांब्याच्या भांडय़ाची संकल्पना वापरली आहे असे पिल्लेई म्हणाले.

सरवणा स्नॅक्स

  • कुठे? मेघराज सिनेमा कम्पाऊंड, शॉप नं ९, प्लॉट नं. २६, सेक्टर-२ वाशी.
  • वेळ- सकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला बंद