नवी मुंबई : सातारा लोकसभा मतदार संघातून अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली . आज त्यांनी नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात येऊन देवदर्शन आणि माथाडी कामगारांची भेट घेतली यावेळी त्यांनी बोलताना आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. साताऱ्यात विकास व्हिजन राबवणार असे शिंदे यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदार संघाची प्रचार सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पार पडली होती. या सभेत सुप्रिया सुळे यांच्या समोर आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचे उमेदवारी मिळावी अशी आशा व्यक्त केली होती. आणि आज पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत कामगारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांना बोलताना ते म्हणाले की ही उमेदवारी म्हणजे निष्ठेचे फळ मिळाले आहे.

हेही वाचा…पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत

पुढील काळात सातारा लोकसभेचे विकासाचे व्हिजन लोकसभेत मांडणार आहे. समोर कोण उमेदवार असेल याची दखल नसून,आज पर्यंत साताऱ्यातील जनतेने कायम शरद पवार आणि राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला आहे.  यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.आपण मोठ्या मतधिक्याने निवडून येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. 

Story img Loader