अज्ञातांवर गुन्हा दाखल; सिडकोच जबाबदार असल्याचा आरोप
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या गावातील करंजाडेनोड येथील शाळेतील साहित्य व खिडक्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांनी मात्र या घटनेला सिडकोच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
सिडकोच्या माध्यमातून करंजाडे नोडमध्ये शाळा उभारली आहे. येथील परिस्थिती पाहता, सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी वारंवार ग्रामस्थांनी केली होती, मात्र ही आमची जबाबदारी नसल्याचे सांगत सिडकोने हात झटकले होते. याचाच फायदा घेत अज्ञातांनी हा प्रकार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी सिडकोने येथे तात्पुरत्या स्वरूपाची शाळा वहाळ व करंजाडे नोडमध्ये उभारली आहे. ही शाळा बांधण्यासाठी १५ कोटी खर्च आला आला आहे. मात्र सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
समाजकंटकांनी या इमारतीत घुसखोरी करून शालेय साहित्य फळा, कपाटे, खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली असून, या प्रकारामुळे परिसरात भीती पसरली आहे. या शाळेत आमची मुलं सुरक्षित नाहीत अशाही भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात सबंधित अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबंधित शाळेला सकाळी भेट दिली असून, पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे. त्याप्रमाणे जिल्हा कार्यालयाला माहिती देण्यात येईल, असे गटशिक्षणाधिकारी रंजना चासकर यांनी सांगितले. तर ही तोडफोड चोरीच्या उद्देशाने झाली नसून शाळेचे नुकसान व्हावे या उद्देशाने झाली आहे. जर सुरक्षारक्षक नेमून दिले असते तर ही अवस्था झालीच नसती, असे मुख्याध्यापक रमेश मते यांनी सांगितले.
- करंजाडे येथील शाळेत मोठे ओवळे गावातील १२९, कोपर गावातील ९५, चिंचपाडा गावातील २८०, कोल्ही गावातील २२, वाघिवली वाडा गावातील ३० असे एकूण ५५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आमच्या कमिटीमार्फत शाळेतील शिक्षकांसह जाऊन पोलीस तक्रार दिली आहे. यापुढे यापेक्षा भयंकर घटना घडू शकतात. त्यामुळे सिडकोने लवकरात लवकर सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसवावेत. – प्रेम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती कोपर
या शाळा जिल्हा परिषदेला हस्तांतरण केले आहे, त्यामुळे देखभालीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. सिडको एकाच वेळी करणारा खर्च देऊ शकतात, मात्र वारंवार होणारा खर्च देण्यात येत नाही. – नरसिंह बायस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता सिडको