उरण: उरण- पनवेलच्या विविध खाड्या, किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे. तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजविण्यात येत आहेत. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना याचा आर्थिक फटका बसला आहे. या मत्स्य दुष्काळाने उपासमारीची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण-पनवेल परिसरातील करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, पाणजे, कुंडे गाव खोपटा, वशेणी, न्हावा, गव्हाण, कोपर, उलवा आदी परिसर पारंपारिक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. पारंपारिक पद्धतीने सुरु असलेला मासेमारीचा व्यवसायच येथील मच्छीमारांचे रोजी रोटीचे साधन आहे. पारंपारिक पद्धतीमध्ये बदल करून या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यवसायात वाढ केली आहे.

परंतु गेल्या काही वर्षात या व्यवसायात अनेक अडचणी उदभवू लागल्या आहेत.वाढत्या जल प्रदूषणामुळे या व्यवसायावर फार मोठे संकट आले आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत आणि खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे. “सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन ” या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई, रायगडच्या सागरी व खाडी परिसरात १२५ माश्यांच्या जाती आढळून येत होत्या. त्यापैकी आता फक्त ७८ जाती शिल्लक आहेत.

हेही वाचा… पनवेल: नववीच्या वर्गात काढलेल्या एका लज्जास्पद छायाचित्रामुळे विद्यार्थीनीने जिवनयात्रा संपविली

खाडी, किनारपट्टीवर मिळणारे बोंबील, ढोमी, मांदेली, घोळ, कलेट, कोलंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या, कोळीम, बोईट, पाखट, बाकस, हेकरु, तांब, मुशी, रावस, जिताडी, शेवंड, पाला, करपाल, टायनी-कापसी कोळंबी, इत्यादी माश्यांचे प्रकार आढळतात. हेच मासे कोळी बांधवाना दैनंदिन रोजी-रोटी मिळवून देतात.

पनवेल कोळीवाडा, गव्हाण,कोपर हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळ बाधित झाले आहे.तर उरण तालुक्यांतील हनुमान कोळीवाडा, पाणजे, मोरा, घारापुरी, न्हावा, गव्हाण हा भाग जेएनपीटी बंदर,शिवडी-न्हावा सि-लिंक या प्रकल्पामुळे बाधीत झाला आहे.करंजा, केगाव, खोपटा,आवरा,वशेणी आदी समुद्र किनारा, खाडी परिसर ओएनजीसी आणि जेएसडब्ल्यु आणि परिसरात उभारण्यात आलेल्या कंटेनर यार्ड आणि बंदरांमुळे बाधीत झाला आहे.तिसरी मुंबई घोषित केल्याने या भागात येणारे नवे प्रकल्प,कोस्टल रोड,बंदरे,जेट्टी आदी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली खारफुटीची बेसुमार कत्तल केली जात आहे.

हेही वाचा… दिवाळीच्या सुट्ट्या रक्तदानाच्या मुळावर; मुंबईसह नवी मुंबई परिसरात रक्ततुटवडा

दुषित रासायनिक मिश्रित सांडपाणी समुद्र, खाड्यामध्ये सोडण्यात येत आहे.कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या रासायनिक मिश्रित दुषित सांडपाण्यामू जल प्रदूषण मोठ्या वाढले आहे.या वाढत्या प्रदूषणामुळे या क्षेत्रांतील भागातून विविध माश्यांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत.यामुळे माशांचे प्रमाण कमी झाले आहे.मासेच मिळेनासे झाल्याने येथील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले असल्याची माहिती कोकण किनारा मच्छिमार संघटनेचे जयवंत तांडेल यांनी दिली. अशी अनेक संकट, समस्या पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमार भेडसावत आहेत. बंदराच्या वाढत्या विकास आणि सागरी प्रदूषणामुळे पारंपारिक स्थानिक मच्छीमार मत्स्य दुष्काळात सापडलेले आहेत.विकासाच्या नावाखााली होणाऱ्या जल प्रदूषणाचीच अधिक भीती स्थानिक पारंपरिक मच्छीमारांना वाटूू लाागली आहे.

वाढत्या जलप्रदूषणामुळे मासेमारी क्षेत्र तसेच मासळीच्या प्रजननाची ठिकाणे नष्ट झाले आहेत. तसेच चिखलाचे थर वाढले आहेत.आदि कारणे आणि जलप्रदूषणामुळे पारंपारिक मासेमारी धोक्यात आली असल्याची माहिती मच्छिमारानी दिली आहे.