नियोजनबध्द वसवलेल्या नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंग केलेल्या वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील सीवूड्स विभागाला अल्पावधीतच कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरातच झालेल्या मॉलमध्ये या परिसराला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.परंतू या मॉलमुळे सीवूड्स पूर्व पश्चिम भागाला महत्व आलेले असताना अनेक समस्यांचाही विळखा पडला आहे. सीवूड्स पश्चिमेला याच मॉलच्या बाहेर रस्त्यालगत असलेला बसथांबा हा बसथांबा की पार्किंगचा थांबा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात विविध बेकायदेशीर फेरीवाले आपले बस्तान बसवत असून त्यामुळे या परिसराल बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. तर बसथांबा आहे.त्या थांब्यावर बस थांबतात तेथेच बेकाया पार्किंगच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे बस थांबणार कुठे व प्रवाशांनी बसथांब्यावर थांबायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉलमध्ये जाणाऱ्यांची गर्दी मोठी असून पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा