उरण : उरण-पनवेल या रहदारीच्या मार्गावर जुलैत झालेल्या हत्याकांडानंतर उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर, मागील अनेक महिन्यांपासून शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने उरणमधील महिला आणि रहिवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे चित्र आहे. याकडे उरण नगर परिषद व सुरक्षा यंत्रणेचेही दुर्लक्ष व दिरंगाई होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई आणि उरण तालुक्याला जोडणाऱ्या अटल सेतू आणि रेल्वे सेवेमुळे हे अंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांवर आले आहे. त्यातच, उरण तालुक्यातील वाढते व्यवसाय, कंटेनर यार्ड्स आणि बंदर यामुळे हजारो रहिवासी हे दररोज येजा करीत आहेत. यामुळे, उरण परिसरातील फ्लोटिंग पॉप्युलेशनची संख्या वाढली असून गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली असून हत्या आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

हे ही वाचा…शिक्षक, मदतनीसांची चारित्र्य पडताळणी; नवी मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी निर्णय

दरम्यान, उरण शहरातील बाजारपेठ ही तालुक्यातील व्यावसायिक आणि रहिवाशांसाठी मुख्य बाजारपेठ असल्याने दररोज हजारो रहिवासी हे बाजारहाटासाठी येत असतात. त्यातच, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही हे गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ह्यह्णतिसरा डोळाह्णह्ण बंद झाला आहे.

तसेच, वर्षभरापूर्वी उरण शहर आणि परिसरात सुमारे ८५ सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून देण्यात आला होता. तर, गेल्या महिनाभरापूर्वी उरण रेल्वे स्थानकानजीकच्या परिसरात एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा…सिडकोचे खारघरचे घर २ कोटींना; पहिल्याच दिवशी १२०० इच्छुकांची नोंदणी

महिलांच्या सुरक्षिततेसाठी बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी आणि शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चारफाटा येथे तसेच, उरण शहरातील शाळांच्या बाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोंवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. यामुळे, उरण शहरातील बाजारपेठ, बाग आणि रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. उरणच्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी उरण नगर परिषदेच्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली.

सीसीटीव्ही बंद

उरण शहरातील बंद सीसीटीव्ही सुरू करून शहरातील हालचालीवर नियंत्रण ठेण्यासाठी कक्ष उभारण्यात येणार असून याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरू आहे. – जितेंद्र मिसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security of women and residents of uran come to light after crime started increased sud 02