नवी मुंबई : पुढील महिन्यात बांगलादेशात होऊ घातलेल्या १२ वर्षांखालील खेळाडूंच्या दक्षिण आशिया लॉन टेनिस स्पर्धेत नवी मुंबईतील हृषीकेश माने याची निवड झाली आहे. ही स्पर्धा आठ देशांत होणार असून याचा पुढील टप्पा हा कजागिस्तान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले असून, त्यांत आता कोपरखैरणे येथे राहणाऱ्या हृषीकेश माने याचा समावेश झाला आहे. हृषीकेश याची बारा वर्षांखालील दक्षिण आशियाई  लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याच्या सोबत पुण्यातील स्मिथ उंदरे आणि राजस्थान येथील विवान मिर्झा यांचीही निवड झाली आहे. ही स्पर्धा १६ ते २० मेदरम्यान बांगलादेश येथील ढाका येथे होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, चीन, जपान, श्रीलंका, बांगलादेश, कजागिस्तान आणि इंडोनेशिया या आठ देशांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा >>>शहरातील विद्युत खांबांवर टाकलेल्या अनधिकृत केबल्स हटवा अन्यथा कारवाई; नवी मुंबई महापालिकेचे संबंधित एजन्सींना आवाहन

हृषीकेश प्रवीण माने  हा कोपरखैरणे येथे राहत असून त्याचे आई-वडील डॉक्टर आहेत. इंडियन टेनिस फेडरेशनतर्फे तो खेळणार असून नेरूळ जिमखाना येथे त्याचा सराव गीतेश अवस्थी यांच्या मार्गदर्शखाली सुरू आहे. त्याची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हृषीकेशमध्ये ही स्पर्धा जिंकण्याची निश्चितच क्षमता आहे, असा विश्वास त्याचे कोच अवस्थी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of player from navi mumbai in south asian lawn tennis tournament amy