पनवेल: पनवेल आणि उरण तालुक्यामधील विविध गावांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी तळमळीने काम करणारे रोडपाली गावातील जेष्ठ पदाधिकारी गोकुळ पाटील यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धपकळाने निधन झाले. पाटील हे ८५ वर्षांचे होत. पाटील यांच्याकडे पनवेल तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे २० वर्षांपेक्षा अधिक काळ नेतृत्व होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाटील यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पाटील यांच्या मृत्यूसमयी त्यांचे पुत्र सुदाम यांच्याकडे पनवेल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पद आहे. पाटील यांच्या अंत्यविधीला भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी रोडपाली स्मशानभूमीत उपस्थित होते.