पनवेल : नवी मुंबईसह पनवेलमध्ये वाढत्या वाहनचोरी आणि घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तातडीने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. वाढत्या वाहनचोरींमुळे वाहनमालक हैराण झाल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले होते. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्तांनी घेतल्यानंतर चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे स्वतंत्र पथक चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नेमले आहे.

दिवसाला दोन वाहने सध्या नवी मुंबईतून चोरीस जात आहेत. मागील दोन वर्षांत १९८९ वाहने चोरीस गेली होती. पोलीस आयुक्त भारंबे यांच्यासमोर वाहनचोरी आणि घरफोड्यांवर नियंत्रण आणणे हे आव्हान आहे. आयुक्तांनी नवी मुंबईतील पाच हजार पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमधून निवडून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई, उत्तम घेंगडमल, प्रविण फडतरे, ईशांत खरोटे या चार अधिकाऱ्यांना चोऱ्या रोखण्याची जबाबदारी दिली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – धोकादायक वृक्ष छाटणी दिरंगाई भोवली? पावसाच्या तुरळक सरीत शहरात ८ झाडांची पडझड

नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे चारही अधिकारी थेट काम करणार आहेत. नव्याने स्थापन केलेले आयुक्तांचे खास पथक किती दिवसांत नवी मुंबईतील वाहनचोऱ्या आणि घरफोड्या रोखतात याकडे वाहनमालकांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader