नवी मुंबई : नवी मुंबई लगत असलेल्या एमआयडीसीतील कलर कंपनीच्या गोदामाला लागली भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दल शर्तीचे प्रयत्न करीत आहे. सुदैवाने आता पर्यंत आगीत कुठलीही जीवित हानी झाल्याचे समोर आले नाही. एमआयडिसीतील पावणे गावाजवळ प्लॉट नंबर डब्ल्यू १२७ येथे असलेल्या कंपनीत पावणे सहाच्या सुमारास आग लागली. घटनेच्यावेळी कंपनीमध्ये अनेक कर्मचारी होते .आग पसरण्याचा आदी सगळे कर्मचारी सुरक्षितेणे बाहेर पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र रंग कंपनी असल्याने ज्वालाग्राही पदार्थ आत मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळातच जवळपास पूर्ण कंपनी आग पसरली आणि आगीने भीषण रूप धारण केले. आग लागलेल्या गोदामाजवळच अनेक केमिकल कंपन्या असल्याने तेथे पर्यंत आग पोहचू न देण्याची काळजी घ्यावी लागत आहे. अग्निशमन दलाची टीम आग वीजवण्याचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून यात वाशी , कोपरखैरणे, पावणे एमआयडीसी, नेरुळ आदी अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी आहेत. अशी माहिती वाशी अग्निशमन दलाने दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Severe fire at pawne midc in navi mumbai ysh
Show comments