नवी मुंबई पोलिसांच्या मानवी तस्कर विरोधी पथकाने मंगळवारी वाशी परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी वाशी परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छापेमारीत पोलिसांनी देहव्यापारात अडकलेल्या चार तरुणींची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. संबंधित तरुणीकडूनच सेक्स रॅकेट चालवलं जात होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एपीएमसी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने ‘मिड डे’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशी येथील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला आणि छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी जबरदस्तीने देहव्यापारात गुंतलेल्या चार तरुणींची सुटका केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता १७ वर्षीय तरुणी सेक्स रॅकेटची मुख्य सूत्रधार निघाली.

पत्नीसोबतचा Sex व्हिडिओ केला व्हायरल, पुुण्यातील धक्कादायक घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Vasu Baras 2024 Date Shubha Muhurat! What is meaning of Vasu Baras
Vasu Baras 2024 Date: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Squirrel and new born baby video
‘आई कोणाचीही असो…’ नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जगवण्यासाठी खारुताईची धडपड; VIDEO पाहून येईल आईची आठवण
Karjat-jamkhed Assembly Election Result 2024, कर्जत-जामखेड Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
Karjat-jamkhed Vidhan Sabha Election Result 2024 Live: कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

हेही वाचा- मुंबईत बड्या उद्योगपतीकडून अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार, गुन्हा दाखल

आरोपी तरुणी ही मुंबईतील मलाड परिसरातील रहिवाशी आहे. ती वेश्याव्यवसायातून मिळालेल्या पैशांपैकी काही पैसे पीडित तरुणींना द्याय ची आणि उर्वरित रक्कम स्वतःसाठी ठेवायची, असं एफआयआरमध्ये नमूद केलं आहे. सेक्स रॅकेटमधून सुटका झालेल्या सर्व तरुणींचं वय २० वर्षांच्या आसपास आहे. यातील एक तरुणी नेपाळ आणि इतर दोन तरुणी मूळच्या बिहारमधील रहिवाशी आहेत. संबंधित सर्वांना सुधागृहात पाठवलं.

हेही वाचा- धारावीमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; अल्पवयीन आरोपीची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी

यावेळी पोलिसांनी ८४ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, एक घड्याळ आणि रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.