शरद पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातली जनता अजूनही विसरलेली नाही. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपाच्या तिकीटावर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली. परंतु, या निवडणुकीत उदयनराजे भोसले पराभूत झाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी भर पावसात सभा घेतली होती. या सभेनंतर साताऱ्यातली राजकीय गणितं बदलली, शरद पवारांना मतदारांकडून सहानुभूती मिळाली. आज (२६ नोव्हेंबर) पुन्हा एकदा शरद पवारांची तशीच सभा पाहायला मिळाली. शरद पवार यांनी नवी मुंबईतल्या नेरूळ येथे भर पावसात भाषण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेरुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद पवार उपस्थित होते. पाऊस आणि जोराचा वारा वाहत असल्याने येथेही साताऱ्याची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सभास्थळी ऐकायला मिळाली. शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांनी या लोकांना नाराज केलं नाही. पवारांनी भर पावसात भाषण केलं. साताऱ्यातल्या सभेत दिसलेला शरद पवारांचा तोच जोश, तोच उत्साह आणि तीच आक्रमकता आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

महिला बचत गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, आज अनेक महिलांनी, त्यांच्या संघटनांनी चांगले स्टॉल्स उभे केले आहेत. पावसामुळे थोडी निराशा झाली. परंतु, माझं एवढंच सांगणं आहे की निराशा हा विषय तुमच्या मनात कधी येऊ देऊ नका. आपण निराशेवर मात करू, संघर्ष करू. धैर्याने पुढे जाऊ आणि हा कार्यकर्म राबवण्याचा निर्धार करुया.

हे ही वाचा >> “संदीप क्षीरसागरांचं घर कोणी जाळलं?” जरांगेंवर आरोप करणाऱ्या भुजबळांना रोहित पवारांचा प्रश्न; म्हणाले, “सत्तेतल्या लोकांनी…”

या मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक बचत गट सहभागी झाले होते. यात आयोजकांनी त्यांच्या उत्पादनांना स्टॉल्स उपलब्ध करून दिले होते. मात्र पाऊस आणि वाऱ्याने त्यांचीही त्रेधा तिरपीट उडाली. परंतु, शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी अनेकजण थांबले होते.