नवी मुंबई: २६ नोव्हेंबर या दिवशीच देशात संविधान अमलात आले. देश प्रगती करित असताना काही घटक देशात अराजकता निर्माण करित आहेत. अशा वेळी जनतेने निराश न होता काम करण्याचा निर्धार केला़ पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नवी मुंबई येथे बोलताना व्यक्त केले.
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन नेरुळ येथे केले होते. यावेळी ३०० पेक्षा अधिक बचत गट आणि शेकडो महिलांची उपस्थिती मेळाव्याला लाभली होती. या मेळाव्यात द्वारे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पासून पावसाने हजेरी लावल्याने नियोजित कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला . यावेळी भर पावसात पवार यांनी भाषण करताना म्हटले आपण एकत्र आलोत मात्र पावसाने त्यांची निराशा झाली मात्र निराशा अजिबात येऊ देऊ नका. हाच कार्यक्रम नेटाने पुढे नेण्याचा निर्धार करूयात. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आलात त्या बद्दल तुमचे आणि आयोजकांचे अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो म्हणत एवढे दोन अडीच मिनिटे पवार यांनी भाषण केले.
हेही वाचा >>>सातारची पुनरावृत्ती होणार काय? नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पाऊस आणि जोरदार वारा
यावेळी महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ म्हणून स्टोल्स उपलब्ध करून देण्यात आले होते.या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहून पक्षात नवचैतन्य निर्माण करतील अशी अशा कार्यक्रमांना वाटत होती मात्र त्यांची घोर निराशा झाली. यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील ,महिला अध्यक्षा सलुजा सुतार , जी एस पाटील संदीप सुतार आदिनी मेहनत घेतली.