विकास होत असला तरी त्या कामात शेतजमीन जात आहे. त्यामुळे केवळ शेतीवर निर्भर न राहता जोड धंदा आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या इमारत उद्धटनासाठी ते नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी कामगारांचा मुंबई प्रवास सांगत तरुण पिढीने आव्हाने स्विकारण्यास तयार राहण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा- ग्रामस्थांचा द्रोणागिरी बचावचा नारा, पोखरणीमुळे करंजामधील नागरिकांचे मुखमंत्र्यांना साकडे

Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Effects of climate change on agriculture Global warming Cyclone
शेतकऱ्याच्या अनुभवांचे बोल मोलाचे!
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी

शेतीवरचा भार कमी करून दुसऱ्या व्यवसाय हे कसे होतील या संदर्भात सरकारने विचार केला पाहिजे. गिरणी कामगारांचा संप झाला. संपाला विरोध नाही पण व्यवसाय संपेपर्यंत संप केला गेला तो संप संबंधीत कामगार नेत्याने जास्त वेळ चालवल्याने गिरणी कंपन्या बंद पडल्या. १२० गिरणी मिल बंद पडल्याने  संसार उध्वस्त झाले. कामगार देशोधडीला लागले. मात्र पुढची पिढी उभी राहिली, असे म्हणत पवार यांनी मुंबईतील कामगार इतिहास कथन केला. शेतकऱ्यांनी नाविन्याचा स्विकार करणे आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी नाशिक येथील अनुभव सांगितला. नाशिकला गेल्यावर तेथे द्राक्ष उत्पादक शेतकरी बैठक झाली. त्यात विदेशी द्राक्ष बियाणे लावण्याचा निर्धार केला. नवीन जात आली आहे. यावर पाऊस, थंडी, ऊन याचा फारसा परिणाम होत नाही. त्याचे त्यांनी कौतुक केले. भारतातून फळे मोठ्या प्रमाणात निर्यात होतात मात्र काही नियमात बदल झाल्याने निर्यात घटली. या साठी केंद्र राज्य ते शेतकरी संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगत बांग्लादेश मोठ्या प्रमाणात फळ निर्यातीवर भर देत असल्याची माहिती दिली.

हेही वाचा- नवी मुंबईत बहुचर्चित सायकल ट्रॅक वादात ! ६० झाडे तोडल्याप्रकरणी बेलापूरच्या सहाय्यक आयुक्तांनी नेरुळ उपअभियंत्याला बजावली नोटीस 

आज ५६ टक्के लोक शेती करतात..बाकीचे लोक इतर व्यावसाय , नोकरी करतात शेतीवरील बोजा कमी केला पाहिजे..आता लोकसंख्या वाढूनही जमीन कमी आहे.. नवी मुंबईत भात शेती  होती. आता शहर झाले. नागपूर संमृध्दी मार्गात शेतीची जमीन गेली. कारखानदारी वाढली असल्याचेही पवार म्हणाले.

हेही वाचा- नवी मुंबई कचरामुक्त शहर नाहीच; आजही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

पुणे आता शिक्षणााबरोबर उद्योगाचे माहेरघर झाले आहे

कारखानदारी उभा राहते ही चांगली गोष्ट असली तरी शेती कमी होत आहे. यासाठी कमी शेतीत उत्तम पिक काढले पाहिजे. उत्पादन वाढवले पाहिजे.
मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्था बाबत बोलताना त्यांनी ही २१८ वर्ष जुनी असून या संस्थेने ज्योतीबा फुलेंना महात्मा ही पदवी पहिल्यांदा दिल्याचा दावा केला.

हेही वाचा- नवी मुंबई : सायबर सिटीत महिला अत्याचारात वाढ; बहुतांश प्रकरणात जवळचे नातेवाईक परिचितच आरोपी

भाषणात पवार यांनी राजकारण विषय कटाक्षाने टाळला मात्र कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी व्हॅलेंटाईन डे बाबत केंद्राच्या निर्णयाबाबत मिश्किल भाष्य केले.गाईला मिठी मारण्याचा आदेश आज परत घेतलाय. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्राला चांगलं पत्र लिहिलं, त्यांनी केंद्राला चिंता व्यक्त केली. व्हॅलेंटाईन डे ला गायीला मिठी मारायला गेलो तुम्ही लाथ मारली  तर माझं कपाळ फुटेल, आणि पुढून मिठी मारल्यावर गाईने शिंग मारली तर ते माझ्या पोटात जाईल त्यातनं आमची सुटका करा. सध्या हा आदेश मागे घेतला हे बरे झाले. 

Story img Loader