Navi Mumbai Crime : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

हे वाचा >> उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना, एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या आरोपीला कर्नाटक सीमेवरून अटक

महिलेवर सामूहिक अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहेत. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रकरण काय आहे?

घरगुती वादविवादाच्या मानसिक तणावात असलेली पीडित महिला ६ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शिळफाटा येथील घोळ गणपती परिसरात आली होती. संपूर्ण रात्र ती या परिसरात होती. या महिलेला मंदिरातील पुजारी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (६२), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (४५) आणि राजकुमार रामफेर पांडे (५४) यांनी पाहिले. तिचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने तिघांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिला चहा पिण्यास दिला. चहा पिताच तिला भांगेची नशा चढली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेवून या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. महिलेला शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरडा करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, या तीन आरोपींनी त्या महिलेस मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilphata navi mumbai gangrape and murder case in fast track ujjwal nikam appointed as public prosecutor kvg