शिंदे गटाच्या नवी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाला ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ हे नवे नाव मिळाल्यानंतरचे हे पहिले कार्यालय ठरले असून उद्घाटन हे नव्या नावाने करण्यात आले आहे. नेरुळ पश्चिमला रेल्वे स्टेशनजवळ हे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर सभागृह तर तळ मजल्यावर अध्यक्ष कार्यालय आणि प्रतिक्षागृह आहे. शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा आणि माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा- आम्हाला मशाल घराघरात घेऊन आग लावायची नाही- अब्दुल सत्तार
हेही वाचा- नवी मुंबई शहराचे लँडमार्क वंडर्स पार्क लवकरच खुले होणार; नव्या खेळण्यांसह देखण्या पार्कचे मेकओव्हर
विजय चौगुले अध्यक्षपदी
कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर वडार भवन येथे पहिला कार्यक्रम घेत पद नियुक्तीचे पत्र सुपूर्त करण्यात आले. यात एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक विजय चौगुले यांच्या गळ्यात नवी मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर संपर्क प्रमुख पदी किशोर पाटकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच उर्वरित नियुकत्या दिवाळीपूर्वी करण्यात येईल, अशी माहिती उपनेते विजय नाहटा यांनी दिली आहे.