आमचीच खरी शिवसेना म्हणत शिंदे गटाने दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे . याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतही माजी विरोधीपक्ष नेता विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली दिघ्यात बैठक पार पडली.
हेही वाचा >>> सिडकोच्या दुर्लक्षामुळे द्रोणागिरी ते पागोटे सागरी महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वाढ
शिवसेना शिंदे गटातर्फे दसरा मेळावा घेण्याचे निश्चित झाले असून याची जोरदार तयारी सुरु आहे. नवी मुंबईत दसरा मेळाव्यानिमित्त प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दिघा विभागातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी दसऱ्या मेळावा यशस्वी करण्यासाठी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासंबंधिच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्यात आल्यात. शिवसेना शिंदे गटाचा पहिला दसरा मेळावा असल्याने मेळाव्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येणार आहे.मेळावा आढावा बैठकीस दिघा विभागातील शिवसेना माजी नगरसेवक नगरसेवक जगदीश गवते, रामआशिष यादव, बहादूर बिष्ट, किशोर गायकर व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हेही वाचा >>> नवी मुंबईकरांसाठी शुभवार्ता.. यंदाही मोरबे धरण १०० टक्के भरणार…
विजय चौगुले (माजी विरोधीपक्षनेते) आमचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. नवी मुंबईतूनही मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी यात सामील होण्याचे निश्चित केले आहे. सध्या दिघ्यात बैठक झाली असून लवकरच सर्वत्र अशा बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे आगामी काळात एकत्रित मार्गर्शन करण्यास मोठे नेतेही येणार आहेत.