तुर्भे नाका परिसरातील शिवसेनेच्या तीन शाखांवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने दावा सांगितलं होतं. दोन्ही कडील कार्यकर्त्यांनी तिन्ही शाखा कार्यालयास आपापले टाळे लावले होते या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त यांची भेट घेतली. या वेळी शिंदे गटाची सुरू असलेली ही दडपशाही तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज पोलीस उपायुक्तांकडे केली.

हेही वाचा >>>चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करंजा-रेवस बंदर रस्ते मार्गाने जोडणार

तुर्भे नाका परिसरातील तीन शाखा गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. या शाखांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाते. मात्र शिंदे गटाच्या कार्यकत्र्यांनी या शाखा बळकावण्याचा घाट घातल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला तर शाखेचे सर्व देखभाल दुरुस्ती भाडे आम्हीच देत आलोत म्हणून आमचाच हक्क अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती. त्यामुळे वाद निर्माण होऊन दिवसरात्र सुरू असलेल्या या शाखांना आता टाळे लावण्यात आले आहे. शिंदे गटाची सुरू असलेली ही दडपशाही तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी आज गुन्हे शाखाचे उपायुक्त सुरेश मेंगडे आणि परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे केली. उपायुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, संदिप पाटील, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख महेश कोटीवाले, विनोद मुके, उपविभागप्रमुख आशोक विघ्ने किशोर लोंढे, शाखाप्रमुख आशोक भामरे, सिध्दाराम शिलवंत, प्रविण पाटील, दत्तात्रय दिवाणे आदींचा समावेश होता. 

Story img Loader