नवी मुंबई : बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना संपली अशी आरडा ओरड सुरू केली असली तरी त्यामध्ये काही तथ्य नाही. उलट गद्दारांच्या रूपाने कचरा बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकानंतर मतदार गद्दारांना त्यांची जागा दाखवणार आहेत. असे प्रतिपादन खासदार राजन विचारे यांनी केले. कोपरखैरणे येथे पार पडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्या दरम्यान ते बोलत होते. त्यांनी मातोश्री आणि शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा बदला महाराष्ट्र घेणार असून  निवडणुकीनंतर गद्दार औषधालाही सापडणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेचे कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार ठेकेदाराला मुदतवाढीची घंटा…..

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान

कोपरखैरणे येथील सेक्टर १० मधील लोहाणा समाज हॉलमध्ये बुधवारी सायंकाळी शिवगर्जना मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना खासदार राजन विचारे यांनी शिंदे  गटावर टीका केली. गद्दार असा उल्लेख करीत ते गेल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि शिवसेना पदाधिकार्‍यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. हे गद्दार बाहेर जाण्याची प्रत्येक जण वाट पाहत होता. त्यांच्याबरोबर फक्त ठेकेदार गेले असून निष्ठावंत शिवसैनिक जागेवर राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा भविष्यकाळ हा फार उज्ज्वल आहे, असेही विचारे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, नवी मुंबई संपर्कप्रमुख निलेश पराडकर, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, संपर्क संघटक रंजना नेवाळकर, संपर्कप्रमुख विद्याधर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, माजी नगरसेवक एम. के. मढवी, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने, रवींद्र म्हात्रे, उपस्थित होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई: तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत; पनवेलमधील धक्कादायक घटना

या मेळाव्याला आमदार भास्कर जाधव आणि अंबादास जाधव या प्रमुख नेत्यांनी दांडी मारल्याने शिवसैनिकात चर्चेचा विषय होता तसेच हे दोन नेते येणार नाहीत हे लक्षात आल्याने अनेकांनी काढता पाय घेतला.

Story img Loader