भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी छोट्या पक्षांना संपवयाचे आहे, असे विधान केले आहे. त्याच पद्धतीने भाजपा सरकार आकसापोटी ईडीला हातीशी धरून कारवाई करीत आहे, असा थेट आरोप माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला आहे. जवाब नोंदवण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते त्यावेळी शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली. ईडी कधीही अटक करेल अशी भीती आम्हा सर्वांना वाटते, असे म्हणत जाधवांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “आता हिशोब अनिल परबांचा”; दापोलीतील रिसॉर्टवरून किरीट सोमय्यांचा इशारा

नवी मुंबई शिवसेना कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा करीत काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तत्पूर्वी पार पडलेल्या सभेत माजी मंत्री भास्कर जाधव यांनी आक्षेपार्थ विधाने केल्याचा ठपका ठेवत एनआरआय पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत गुरुवारी जवाब नोंदवण्यात आला त्या नंतर त्यांनी वाशीतील शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. मी जे बोललोच नाही असे शब्द, वाक्य माझ्या तोंडी  घालून गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पोलिसांना विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी मौन बाळगले. असा दावा जाधव यांनी केला. तसेच शिवसेना नेते संजय राउत यांना मिळालेल्या जामीनाबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाला त्यांनी धारेवर धरले. ईडीवर न्यायालयाने ओढलेले ताशेरे वास्तविक केंद्र सरकार, भाजपावर ओढलेले आहेत. संजय राउत राउत यांची अटक बेकायदाच आहे. आकासपोटी अटक केल्यानंतर न्यायालयात जाण्यासाठी विलंब लावला जात आहे. ईडी सारख्या संस्थेने दबावाखाली काम करून आपली प्रतिमा डगाळू नये. चूक असो वा नसो भाजपा व्यतरिक्त अन्य राजकीय नेत्यांना ईडी कधीही अटक करेल, अशी भीती नेहमी वाटते.

हेही वाचा- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला सोडून गेलेल्या ४० आमदारावर पूर्वी ठाकारे यांचा अंकुश होता आता त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नसून भाजप जसे सांगेल तशी विधाने ते करतात. यापूर्वीही भाजप नेत्यांनी बेछूट वक्तव्य केले त्याचे समर्थन देवेंद्र फडणवीस करत नाहीत मात्र त्यांच्या पाठीशी उभे राहतो असे बेधडक म्हणतात. असा दावाही त्यांनी केला.