नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजारातील काही दुकान धारकांनी त्यांच्या जागेच्या व्यतिरिक्त रस्तावर मालाचे बस्तान मांडून रस्ता गिळंकृत केला आहे. धान्य बाजारातील अ आणि ब गल्ली समोर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तील पादाचाऱ्यांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न भाजी बाजारात पाच ही बाजारात शेतमाला व्यतिरिक्त पान ,चहा टपरी, हॉटेल, छोटे स्टॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र काही दुकानधारक दिलेला जागेच्या व्यतिरिक्त अतिरिक्त जागा वापरून व्यवसाय करत आहेत. धान्य बाजारातील अ आणि ब गल्ली समोर प्लास्टिक तसेच चिवडा दुकान धारक यांनी दिलेल्या जागे शिवाय रस्त्यावर साहित्य ठेवून विक्री करित आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात या अवजड तसेच मोठमोठे टेम्पो दाखल होतात. तसेच दुचाकी वाहने देखील उभी केलेली असतात, अशातच येथील दुकान धारकांनी रस्त्यावरच थाटलेल्या मुळे पादचाऱ्यांना आणि वाहन चालक यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopkeepers at the mumbai agricultural produce grain market display their wares on the road amy
First published on: 25-06-2024 at 18:34 IST