लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उरण : रविवारचा सुट्टीचा दिवस साधत सध्या उरण तालुक्यातील अनेक गावातील भातशेतीच्या कापणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा भरवसा नसल्याने कापणी आणि मळणी एकाचवेळी शेतात उरकून भात घरी नेले जात आहे. शेतात आलेलं पीक हाती लागावं यासाठी उरण मधील शेतकऱ्यांची ही लगबग सुरू झाली आहे.
साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात भात पिके तयार होतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात भात पिकांची कापणी सुरू केली जाते. भाताचे हे कापलेले पीक शेतात ठेवलं जातं. याकाळात हे पीक उन्हात सुकत आणि त्यानंतर या पिकांची एकत्रित साठवण करून त्याची त्यानंतर दिवाळी किंवा त्यापुढे सवडीने मळणी केली जाते.
आणखी वाचा-उरण : गरजेपोटी घरांसाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात
मात्र सध्या पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेले भात पीक गमवावे लागत आहे. यावर्षी तर परतीचा पाऊस कधी येईल याची शाश्वती नाही. तसेच हल्ली वर्षभरात कधी आणि कोणत्याही वेळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी हा मार्ग निवडला आहे. त्यातच शेतीचा वाढता खर्च,मजुरांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांनी मधला मार्ग शोधला आहे. यात पीक कापून ते तातडीने शेतातच तात्पुरता खळा तयार करून झोडून,पाखरून पिशवीत भरून घरी नेला जात आहे. त्यानंतर घरी हे भात पुन्हा उन्हात वाळत घातलं जात. त्यामुळे पिकांचे किमान नुकसान होत नसल्याची माहिती कमलाकर पाटील या शेतकऱ्यांनी दिली आहे.