मागील आठवड्याभरापासून नवी मुंबईतील विशेषतः वाशीतील हवा गुणवत्ता निर्देशांक ३५० पार असून वाशीतील हवा अति वाईट असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काल रात्री वाशी परिसरात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी धुके पसरले होते. शहरात आता कडाक्याची थंडी पडली असून थंडीच्या अडून औद्योगिक कंपन्यांकडून रासायनिक मिश्रित वायू हवेत सोडून हवा प्रदूषण करत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.
हेही वाचा- नागपूर : सुनील केदार यांची उमेदवारीबाबत मोठी घोषणा..; काँग्रेसचा शिक्षक मतदारसंघात यांना पाठिंबा
सोमवारी रात्री वाशी विभागात अचानक हवेत जास्त प्रमाणात धूलिकण दिसत होते. त्याचबरोबर हेवचा उग्र वास येत होता. त्यामुळे रहिवाशी क्षेत्रात ही प्रदूषित हवा नित्याचे समीकरण झाले असून शहरातील नागरिक प्रदूषित हवेने त्रस्त झाले आहेत. मागील गुरुवारपासून वाशीतील हवा गुणवत्ता निर्देशांकाने उचांक पातळी गाठली आहे. गुरुवारपासून सलग वाशीतील हवा गुणवत्ता निर्देशांक ३५० एक्युआय आहे. आजही वाशीतील ३५२ एक्युआय, कोपरखैरणे येशील हवा गुणवत्ता २३१एक्युआय, नेरुळ से.१९अ ३६२एक्युआय तर नेरुळ येथील ३२०एक्युआय आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील नागरिकांची प्रदूषित हवेतून सुटका कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.