सिडकोच्या मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) विभागामार्फत सायन-पनवेल महामार्गालगत खारघर ते कंळबोली मार्बल मार्केट पर्यंत असणा-या अनधिकृत जाहिरात फलकावर ( होर्डींग) चार दिवस विशेष निष्कासन मोहिम राबवून १० जाहिरात फलके (होर्डींग) हटविण्यात आले.
हेही वाचा >>> पनवेल : पाण्याविना उद्योग कसे चालवायचे…
ही कारवाई अतिक्रमणे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली असल्यामुळे निष्कासित करण्यात आली. सदर मोहीम मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी, सिडको पोलीस पथक सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. तसेच या कारवाईसाठी ०२ गॅस कटर, १५ कामगार वापरण्यात आले.