पनवेल: पनवेल महापालिकेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी तत्वांवर औषधनिर्माता या पदभरतीसाठी जून महिन्यात उमेदवारांनी अर्ज केले होते. ८ पदांसाठी तब्बल २५९ उमेदवारांनी अर्ज केले. यामध्ये पहिल्या प्राथमिक फेरीत संपुर्ण कागदपत्रे जमा केलेल्या ६ उमेदवार पात्र ठरले असून १९९ उमेदवारांना ९ ऑगस्टपर्यंत त्यांची कागदपत्रे सादर करण्याची नैसर्गिक न्यायाप्रमाणे मुदत पालिकेने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ जून ते १३ जून या कालावधीत औषधनिर्माता या पदाकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्रवर्ग, उत्तम गुण आणि दांडगा अनुभव याला राष्ट्रीय आरोग्य अभियानात पदभरती करताना निवडप्रक्रीयेत प्राधान्य दिले जात असल्याने पनवेल महापालिकेला अनुभवी औषध निर्माता या निवड प्रक्रीयेतून मिळणार आहे.

हेही वाचा… पनवेल: पॅनकार्ड बँकखात्यासोबत लींक करण्याच्या बहाण्याने २ लाख ७० हजार लुटले

सध्या पालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रांत व उपकेंद्रात औषध निर्माता कमी आहेत. त्यामुळे ही भरती होत आहेत. भरती प्रक्रीयेमध्ये २५९ पैकी ५४ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. १९९ उमेदवारांना कागदपत्र पुर्ततेसाठी पालिकेने आवाहन केले आहे. यासाठी उमेदवारांनी टपालाव्दारे तसेच पालिकेच्या मेल आयडी जाहीर केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six candidates eligible pharmacist posts in panvel municipal corporation dvr