पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शिवकर परिसरात सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामुळे सरकारी यंत्रणेतील काही त्रुटी उघड झाल्या आहेत. यात आषाढी वारीसाठी भाविकांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर द्रुतगती मार्गावर आल्यावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत. तर, या मार्गावरील ४४ किलोमीटरच्या टप्प्यात महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे अवघे सहा कर्मचारी मध्यरात्री गस्तीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> घाऊक बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांवर

सोमवारी मध्यरात्री सुमारे ४४ किलोमीटरच्या द्रुतगती मार्गावरील गस्तीसाठी सहाच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सहापैकी चार पोलीस कर्मचारी वाहन गस्तीवर होते. तर अन्य दोन जण पोलीस नियंत्रण कक्षात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. द्रुतगती मार्गावर प्रतिबंधित वाहन रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा महामार्ग पोलिसांकडे उपलब्ध नव्हती, असे चौकशीअंती स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> लाडकी बहीण योजनेसाठी पनवेल पालिकेचे तीन फिरते मदत कक्ष

द्रुतगती महामार्गाला कळंबोली येथून आरंभ होतो. द्रुतगती मार्गावर प्रतिबंधित असलेल्या ट्रॅक्टरने प्रवेश कसा केला,याची माहिती देणारी कोणतीही यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलिसांकडे नाही. चालकाने अनवधानाने प्रतिबंधित वाहन द्रुतगती मार्गावर नेल्यास ते रोखणारी यंत्रणा वाहतूक पोलिसांकडे नाही. हा अपघात होण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी महामार्ग वाहतूक पोलिसांचे गस्ती वाहन गेल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six policemen for patrolling during accident on mumbai pune expressway zws