जेएनपीटी बंदरातून होणाऱ्या आयात निर्यातीच्या मालातून अनेकदा तस्करीचे प्रकार उघडकीस आले असून मंगळवारी घरगुती सामानाच्या कंटेनरमधून आलेल्या सामानातून प्राण्यांची कातडी आणि प्रसिद्ध चित्रकारांची कोट्यवधींची दुर्मिळ चित्रांची तस्करी उघडकीस आली आहे. त्यामुळे बंदरामध्ये तस्कर टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा या घटनेत समोर आले आहे.सीमाशुल्क विभागाच्या तपास मोहिमेतून हा तस्करीचा प्रकार उघड झाला.

जेएनपीटी बंदरात तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून न्हावा शेवा सीमा शुल्क विभागाचेही या तस्करांकडे बारीक लक्ष असते. सीमा शुल्क विभागाच्या के तपासात ३ कोटींच्या ३२ मेट्रिक टन फळांच्या साठ्यासह अघोषित घरगुती वस्तूच्या सामानात मौल्यवान कलाकृती, प्राण्यांचे कातडे असा करोडोंचा माल न्हावा – शेवा सीमा शुल्क विभागाने जप्त केला. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्रा प्राण्याची कातडे, अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ कलाकृती, लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची ३८ दुर्मीळ चित्रे, ज्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे, असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी इराणीयन किवी फळांच्या १७७ मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत ३ कोटी रुपये मूल्याचे ३२ मेट्रिक टन नेकट्रराईन फळ आढळले, तर मंगळवारी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमा शुल्क विभागाने कंटेनरची तपासणी केली. कागदोपत्री घरगुती वस्तू असल्याचे नमूद होते मात्र, प्रत्यक्षात दुर्मिळ वस्तूंची तस्करी करण्यात येत असल्याची बाब समोर आली.

vasai virar gold loksatta news
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
mlas urged prioritizing crime prevention and sand smuggling before planning expenditure in committee meeting
“यवतमाळात गुन्हेगारी, वाळू तस्करांची दादागिरी वाढली; आधी ते रोखण्याचे ‘नियोजन’ करा, मग…” लोकप्रतिनिधी आक्रमक
anti narcotics squad arrested three ganja smugglers in Dombivli seizing 30 kg worth Rs 6 lakh
डोंबिवलीत सहा लाखाच्या गांजासह तीन जणांना अटक, मध्यप्रदेशातून रेल्वेतून गांजा डोंबिवलीत
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Two dogs stood outside the door all night for roti
दोन श्वानांचा जगण्यासाठी संघर्ष; एका भाकरीसाठी ते रात्रभर दाराबाहेर उभे राहिले… PHOTO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली खंत
Major action against sand smugglers Revenue Department destroys 15 boats
बुलढाणा : वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई, महसूल विभागाने १५ बोटी केल्या उद्ध्वस्त

जेएनपीटी बंदरात अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी होत असतानाही तस्करीचे प्रकार सुरू आहेत. जेएनपीटी बंदरातून यापूर्वी सुद्धा अनेकदा तस्करीचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये अमली पदार्थ, रक्त चंदन, घातक हत्यारे, सोनं, चांदी याचप्रमाणे प्राण्यांच्या कातडीचे तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कंटेनर तपासणी होत असतानाही अशा प्रकारची तस्करी आजही होत म्हणजेच आजही जेएनपीटी बंदरामध्ये तस्करांच्या टोळ्या कार्यरत आहेत,हे समोर आले आहे.

Story img Loader