नवी मुंबई : महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कोणतीही परवानगी नसताना फ्लेमिंगो तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास तसेच नेरुळ येथील टी एस चाणक्य तलाव परिसरातील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात सौर दिव्यांचे खांब बसवण्याचा प्रताप नवी मुंबई महापालिकेच्या अंगलट आला आहे. याबाबत पर्यावणप्रेमींकडून महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अखेर गुरुवारी सायंकाळपासून सौर दिव्यांचे खांब काढण्यास सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून बेलापूर परिसरात सौर दिवे लावण्याचे २५ कोटी रुपयांचे काम सुरू करण्यात आले आहे. कांदळवन क्षेत्रात कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना पालिकेकडून बेकायदा सौरऊर्जेवरील पथदिवे लावण्यात येत असून याबाबत कांदळवन विभागाकडे पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. त्यामुळे टी एस चाणक्य तलाव आणि लगतच्या परिसरातील सौर दिव्यांचे खांब काढण्यास महापालिका प्रशसानाने सुरुवात केली आहे. सौर दिव्यांच्या प्रकाशामुळे तसेच खांबांमुळे फ्लेमिंगोंना अडथळा ठरू शकतो.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
Redevelopment is essential for safety middle class citizen Lands freehold
सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य
Ramtekadi dumper and JCB burnt
पुणे: रामटेकडीत डंपर, जेसीबी यंत्र पेटवून देण्याची घटना; ठेकेदाराकडून पोलिसांकडे तक्रार

हेही वाचा – उलवे, खारघर, तळोजासह द्रोणागिरीला पाणी पुरवठा शुक्रवार ते शनिवार बंद राहणार

नेरुळ जेट्टीच्या नामफलकाला धडकून ४ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याबाबत पर्यावरणप्रेमींनी सिडको प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर सिडकोने या ठिकाणचा नामफलक हटवला होता. आता परवानगी नसताना सौर दिवे महापालिकेने लावले आहेत.

नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी संबोधण्यात येत असून शहरभर महापालिकेने फ्लेमिंगोंच्या प्रतिकृती लावल्या आहेत. याच फ्लेमिंगोचा अधिवास असलेल्या पाणथळी नसल्याचे दाखवण्यात आल्याने महापालिका प्रशासन सिडको व राज्य शासन यांच्याविरोधात पर्यावरणप्रेमींमध्ये संताप होता.

१४.७४ हेक्टर क्षेत्र व्यापलेला चाणक्य तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे खारफुटीचे क्षेत्र सिडकोच्या अधिपत्याखाली येते. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला आपल्या ताब्यातील सर्व खारफुटी प्रदेश वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देऊनही सिडको जाणीवपूर्वक ठाणे खाडी हस्तांतरण करण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच सिडकोचाच चाणक्य तलाव बुजवण्याचा छुपा प्रकार असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला. पालिकेनेही या जमिनीवर टाकलेले पाणथळ आरक्षण हटवल्याने आधीच पर्यावरणप्रेमींमध्ये याबाबत संताप असतानाच आता पालिकेने या ठिकाणी सौरऊर्जेवरील पथदिवे लावले आहेत. त्यामुळे हा बेकायदा प्रकार असून संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून सौर ऊर्जेवरील पथदिवे लावण्यात आल्याच्या ठिकाणाची व या एकंदारीतच प्रकाराची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

हेही वाचा – पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा

नेरुळ येथील टी एस चाणक्य तलावात दररोज हजारो फ्लेमिंगो येत आहेत. आता कांदळवन क्षेत्रात सौरऊर्जेवरील पथदिवे लावले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करायला हवा. बफर झोनमध्ये कोणतेच काम करता येत नसताना पालिकेने नियमबाह्य पद्धतीने सौरऊर्जेवरील पथदिवे लावले आहेत. – सुनील अग्रवाल, पर्यावरणप्रेमी

फ्लेमिंगोंना सौरऊर्जेवरील पथदिव्यांचा अडथळाच निर्माण होणार आहे. संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करावी. लाखो किलोमीटरचा प्रवास करून हे फ्लेमिंगो या ठिकाणी येतात तेथे सौरऊर्जेवरील पथदिवे आणि तेही पाणथळ जागेत हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. – रोहित जोशी, पर्यावरणप्रेमी