मराठी नाटकांवर भरभरून प्रेम करणारी रसिक माणसे ही ऊर्जा असून ३२ वर्षात १२५०० प्रयोग करू शकलो ते उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार लाभले म्हणूनच असे सांगत सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांनी रसिकांचा कायम आशिर्वाद लाभला हेच या विक्रमी प्रयोगांमागील खरे गमक असल्याचे नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील विशेष सत्काराप्रसंगी सांगितले.

महाराष्ट्रात ५२ ठिकाणी नाट्यप्रयोग होऊ शकतात, त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे विष्णुदास भावे नाट्यगृह स्वच्छता आणि सुविधांच्या दृष्टीने टॉप फाईव्हमध्ये असून त्यासाठी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियमित जागरूकतेबद्दल प्रशांत दामले यांनी गौरवोद्गार काढले. नवी मुंबईतील भावे नाट्यगृह उत्तम आहेच त्या सोबतच नाटक कसे बघायचे हे उत्तमरित्या कळणारे नाट्यरसिक इथे आहेत असा विशेष उल्लेख त्यांनी केला.

Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Pune Municipal Corporation has taken important decision for success of river improvement scheme
नदी सुधार योजनेच्या यशासाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय, अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
show lakhs of rupees For advertisements of Swachh Bharat Abhiyaan but in reality only few thousand spent in PMC
‘स्वच्छतेच्या’ मजकुरावर लाखभर ‘खर्च’ महानगरपालिकेला कोणी गंडविले?
Kalyaninagar accident case State govt approves prosecution of Dr Ajay Tavere and Srihari Halnor
कल्याणीनगर अपघात प्रकरण : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी
illegal constructions Navi Mumbai, Navi Mumbai,
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर सहा वर्षे उलटूनही कारवाई नाही, उच्च न्यायालयाचा नियोजन यंत्रणांच्या नाकर्तेपणावर संताप
Chartered officers are tempted to join politics Pune news
सनदी अधिकाऱ्यांना राजकारणाची भुरळ!
Mumbai officials ordered strict action against illegal activities ahead of assembly elections
निवडणूक काळात तातडीच्या जप्तीचे आयुक्तांचे आदेश

आपल्या ३९ वर्षांच्या रंगभूमीवरील अभिनय कारकिर्दीत १२५०० प्रयोगांचा टप्पा पार करण्याचा अनोखा विक्रम करणारे सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांचा विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासन विभागाचे उप आयुक्त नितीन नार्वेकर आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या हस्ते शाल, पुणेरी पगडी व सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान कऱण्यात आला. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा हाऊसफुल्ल नाट्यप्रयोगाप्रसंगी संपन्न झालेल्या या गौरवाप्रसंगी नाटकातील सहकलावंत कविता मेढेकर, अतुल तोडणकर, पूर्वा भिडे, अतुल तोडणकर, राजसी चिटणीस, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांनाही सन्मानीत करण्यात आले.

१९८३ साली ‘टुरटूर’ या नाटकापासून आपल्या व्यावसायिक अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या प्रशांत दामले यांनी आपल्या ३९ वर्षांच्या नाट्यकारकिर्दीत १२५०० हून अधिक नाट्यप्रयोग केले. रंगभूमीवरील या विक्रमी वाटचालीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेनेही १२५०३ व्या प्रयोगाप्रसंगी विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष सन्मान करीत प्रशांत दामले यांचे समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.