नवी मुंबईतील वाशी स्थित सेंट लॉरेंस शाळेमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वॉश रूम जवळ जय श्री राम च्या घोषणा दिल्याने त्यांना शाळेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी जय श्री राम च्या घोषणा दिल्या होत्या त्यापैकी सहा विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले.
शाळा प्रशासनाशी अनेकदा प्रयत्न करूनही संपर्क होऊ न शकल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेच विद्यार्थ्यांचे पालकही समोर येण्यास नकार देत आहेत. या संदर्भात पालक संघटनेचे पदाधिकारी विजय साळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत न घेतल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच स्थानिक भाजप पदाधिकारी विजय वाळुंज यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पाल्यांचे भविष्य पाहता पालक बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. असेही त्यांनी सांगितले. मात्र घडलेला प्रकार घृणास्पद असून आज ना उद्या शाळेला याचे उत्तर द्यावे लागणार आहे. असेही त्यांनी सांगितले.