नवी मुंबई महानगरपालिकेतील आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १४ हजार ४०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. प्रशासनाने सुचविलेल्या १४ हजारांच्या रकमेत ४०० रुपयांची वाढ सुचवून स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनाही सहा हजार ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
राज्य शासनाच्या मंजुरीच्या अधीन राहून पालिकेतील कायमस्वरूपी आधिकारी आणि कर्मचांऱ्याना १४ हजार तसेच ठोक पगारावरील, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना ५ हजार ९०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत पटलावर आला होता. या वेळी स्थायी समितीने त्यात चारशे रुपयांची वाढ केली. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचांऱ्यांनाही सानुग्रह अनुदान मिळणार आहे. या सर्व खर्चासाठी पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची तरतूद आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा