नवी मुंबई : कोविड प्रभावित कालावधीनंतर डायलेसीस करणे आवश्यक असणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक पाऊले उचलले असून महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयासोबतच ऐरोली व नेरुळ रुग्णालयात बाह्य यंत्रणेव्दारे डायलेसीस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नवी मुंबई झाली सावरकरमय! गौरव यात्रेत हजारो सावरकर प्रेमींची उपस्थिती

हेही वाचा – नवी मुंबई : दोन बांगलादेशी नागरिकांसह भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे बनवणारा जेरबंद

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात १० बेड्सची डायलेसीस सुविधा आधीपासूनच उपलब्ध होती. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्यामध्ये अद्ययावत बदल करणे आवश्यक होते. यामध्ये प्राईड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने आदित्य बिर्ला कॅपिटल या उद्योग समुहाच्या सीएसआर निधीतून वाशी सार्वजनिक रुग्णालयात असलेल्या १० बेड्सच्या सुविधेचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून, डायलेसीस मशीन व बेड्सची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे नवी मुंबई शहरातील डायलेसीस आवश्यक असणाऱ्या रुग्णांची चांगली सोय होणार असून, याठिकाणी दिवसाला १२ रुग्णांचे हिमोडायलेसीस केले जाऊ शकते. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिदिन १२ अशी या डायलेसीस कक्षाची क्षमता असून, याव्दारे सर्वसामान्य नवी मुंबईकर रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State of the art dialysis facility at navi mumbai mnc vashi hospital ssb
Show comments