लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारचे सामान्य प्रशासनाचे सचिव सुमन भांगे यांनी मराठा आंदोलनातील मागण्यासंदर्भात अनेक मागण्या मान्य केल्या असल्याबाबतचे पत्र दिले आहे. परंतु मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी तसेच सगळे सोयऱ्यांच्या नोंदी बरोबरच. मुलींना केजी टू पीजी मोफत शिक्षण तसेच आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र आदी मागण्यांबाबत आश्वासन नको तर अध्यादेश हाती द्या अशी मागणी केली.
आणखी वाचा-नवी मुंबई : मराठा दिंडी मोर्चा; आता लवकरच मुंबईकडे प्रयाण
जरी सर्व मागण्याबाबत अध्यादेश दिले तरी मुंबईतील आझाद मैदानात जाणारच असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज मराठा आंदोलकांचा मोर्चा नवी मुंबईतच थांबणार असल्याची माहिती ही जरांगे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे लाखो मराठा बांधव पुन्हा एकदा एपीएमसीकडे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतत असल्याचे चित्र वाशीत पाहायला मिळत आहे.