गंजून कोसळल्याने दुर्घटनांत वाढ; बदलण्याची महापालिकेकडे मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई शहरातील रस्ते प्रकाशमान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पथदिव्यांची दुरवस्था झाली असून सिडकोकालीन असलेले हे पथदिवे गंजल्याने खाली पडत असून त्यांमुळे दुर्घटनाही होत आहे. हे पथदिवे बदलावे आणि रस्त्यांवरील प्रकाश व्यवस्थेबाबत पालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहर विकासित होत असताना सिडकोने महापालिकेकडे टप्प्याटप्प्याने कार्यभाराचे हस्तांतर केले. रस्त्यांवरील अनेक पथदिवे हे सिडकोकालीन असून ते पालिकेने बदलले नाहीत. बेलापूर ते दिघापर्यंतच्या आठ विभागांमधील अनेक पथदिवे रस्त्यावर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईच्या गळय़ातील रत्नहार असलेल्या पामबीच रोडवरील ४२८ पथदिवे बदलले जाणार आहेत, मात्र अन्य रस्त्यांवरील पथदिव्यांबाबत अद्याप पालिकेने कोणताच निर्णय घेतलेला नाही. जुन्या माइल्ड स्टीलच्या पथदिव्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक पथदिवे गंजून त्यांची वीजजोडणीही नादुरुस्त झाली आहे. शहरात असलेले दमट हवामान यामुळे हे जुने पथदिवे जमिनीच्या लगत गंजून खाली कोसळत आहेत. सीवूड्समध्ये डी मार्टजवळ रस्त्यावरच पथदिवा कोसळल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. वाशी येथेही एका चारचाकी गाडीवर पथदिवा कोसळून गाडीचे मोठे नुकसान झाले होते. अशा प्रकारे अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पथदिवे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

एक हजार पथदिवे खराब

परिमंडळ                                    एकूण पथदिवे        खराब पथदिवे

बेलापूर ते वाशी (परिमंडळ १)             १८०००             ८००

कोपरखरणे ते दिघा (परिमंडळ २)     १३०००             २००

शहरातील पथदिवे खराब होऊन पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वेक्षण करून शहरातील किती पथदिवे खराब झाले आहेत, याची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर निश्चित दर ठरवून ज्या ठिकाणी पथदिवे खराब झाले आहेत, तिथे ते बदलण्यात येईल. 

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सिडकोकालीन जुने पथदिवे बदललेच पाहिजेत. वाशीमध्ये रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहन उभे असताना गाडीवरच पथदिवा कोसळला. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी योग्य नियोजन करून खराब पथदिवे बदलायलाच हवेत.

– वैभव गायकवाड, माजी नगरसेवक