नवी मुंबईः नवी मुंबई शहरात पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, शीव पनवेल महामार्ग, एमआयडीसीमधील रस्ते तसेच मुख्यरस्त्यांसह शहराअंतर्गत रस्त्यावर सूर्यानारायणाच्या अस्तानंतर उशीराने पालिकेच्या पथदिव्यांच्या प्रकाशाचा उदय होत असल्याने शहरभर अंधार पसरला तरी पालिका हद्दीतील पथदिवे बंदच असतात. कारण या पथदिव्यांचे चालू बंद करण्याचे वेळापत्रक बदलण्याचा विसर पालिका विद्युत विभागाला पडला आहे. परंतू त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘पोलिसां’ची उल्लेखनीय कामगिरी, अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा सहा दिवसात शोध

शहरातून महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्यासाठी असलेला मुख्य सायन पनवेल महामार्ग व त्यामार्गावरील दिवाबत्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेकडे हस्तातरीत केल्यानंतर पालिकेने या मार्गावर एलईडी पथदिवे लावण्याचे काम सुरु केले आहे. तसेच पावसाळ्यात व इतरवेळा सिडकोकालीन पथदिव्यांनी माना टाकल्याचे चित्रही पाहायला मिळाले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरांतर्गत पथदिवे बदलण्यात येत असून एलईडी पथदिवे लावण्यात येत आहेत.नवी मुंबई महापालिका अंतर्गत शहरात असलेल्या हजारो फिटींग या अत्याधुनिक पद्धतीने सूर्य नारायण उगवल्यानंतर बंद होतात तर  सुर्यास्त झाल्यानंतर सायंकाळी ६.३० ते च्या दरम्यान आपोआप सुरु होतात. परंतू सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु असून नोव्हेंबर महिना सुरु झाला असून दिवस छोटा व रात्र मोठी असे चित्र आहे. सध्या सायंकाळी ५.४५ पासूनच कोळोख पडायला सुरवात होते.तर सुर्यास्ताची वेळ ६ वाजण्याच्या सुमारास आहे. परंतू पालिकेची दिवाबत्तीची वेळ ही ६.३० नंतरची असल्याने शहरभर अंधार व रस्ते काळोखात अशी स्थिती पाहायला मिळते. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर सर्वत्र अंधार पडलेला असताना पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळ उडून अनेक अपघातही घडतात.त्यामुळे पालिकेने सुर्याेदय व सुर्यास्त यांच्या वेळांचा ताळमेळ घालून अत्याधुनिक व अॅटोमॅटीक पध्दतीने दिवे बंद चालू होण्यासाठी सुर्योदय व सुर्यास्ताच्या वेळा पाहून टाईमर सेट करणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> कोपरखैरणेत पार्किंगचा बोजवारा, खेळाच्या मैदानावर वाहनांचे अतिक्रमण

शहरातील हजारो पथदिवे नव्याने बसवण्यात आले आहेत. त्यांच्या फिटींग नव्याने बसवण्यात आल्या आहेत. आता एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. परंतू शहरभर अंधार झाल्यानंतरही दिवे लागणार नसतील तर काय उपयोग असा संताप नागरीक व्यक्त करु लागले आहेत.वर्षभरात दिवस लहान तर रात्र मोठी होते.तर काही महिने दिवस मोठा व रात्र लहान अशी स्थिती असते.त्यामुळे वर्षभर दिवाबत्ती सुरु व बंद करँण्याची एकच वेळ ठेवली तर मात्र दिवे असून अंधार अशी स्थिती पाहायला मिळते. त्यामुळे पालिका विद्युत विभागाने याबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. शहरातील सायन पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग उरण फाटा ते मुख्यालय मार्ग, वाशी कोपरखैरणे मार्ग , ठाणे बेलापूर मार्ग तसेच शहरातील सर्वच उड्डाणपुलावरील दिवाबत्ती हे  महत्वाचे मार्ग असून या मुख्य मार्गाबरोबरच शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दिवाबत्तीच्या वेळाबाबतही योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

दिवाळीपासून दिवस लहान व रात्र मोठी असते.त्यामुळे शहरात संध्याकाळी ६ वाजताच अंंधार पडतो पण शहरातील पथदिवे उशीराने सुरु होतात.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलावर तर वाहन चालवताना आणखी अडचण येते पालिकेने दिवाबत्ती सुरु व बंद करण्याच्या वेळाबाबत खबरदारी घ्यावी.

– गजानन पाटील,नागरीक 

सुर्योदय व सुर्यास्ताच्या वेळानुसार दिवाबत्तीच्या बंद व सुरु करण्याच्या वेळा बदलणार आहेत. मुंबई शहरात दिवाबत्तीच्या चालू व बंद करण्याची अत्यधुनिक व्यवस्था आहे. शहरातील पथदिवे सुरु व बंद होण्याच्या वेळांसाठी टाईमर लावलेले आहेत.परंतू सुर्यास्त तसेच सुर्यादय यांच्या वेळा पाहून पथदिवे बंद चालू होण्याच्या वेळात योग्य तो बदल केला जाईल.

– सुनील लाड, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street lights off forget the municipality to change the schedule street lights ysh