नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर दुसरीकडे मुंबई व महाराष्ट्राला जोडणाऱ्या सायन पनवेल मार्गावरील पालिका हद्दीतील दिवाबत्तीची लुकलुक सातत्याने अपघाताला आमंत्रण देत होती. अपुऱ्या वीज व्यवस्थेमुळे व महामार्गावरील अनेक बंद दिव्यांमुळे पालिकेला सातत्याने नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याचा आरोप होत असल्याने पालिकेची बदनामी होत असे.
हेही वाचा- सीमकार्ड ब्लॉक झाल्याचा मॅसेज आलाय? सावधान! अन्यथा तुमच्या बँक खात्यातून पैशांची होऊ शकते चोरी
पालिकेने याच महामार्गावरील पथदिव्यांची लुलकुल बंद केली असून ११९४ पैकी तब्बल ६२८ बंद असलेल्या दिव्यांची दुरुस्ती करुन महामार्ग प्रकाशमय केला आहे. आता नवी मुंबई पालिका हद्दीतील शीव पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची जबाबदारी पालिकेची आहे. या मार्गावरील केबलमध्ये बिघाड आल्याने या मार्गावरील पथदिवे एक दिवस बंद असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाने दिली.
हेही वाचा- श्वानाचे चित्रीकरण करणे पडलं महागात; थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल, वाचा नेमके काय झाले…
पालिका महामार्गावरील पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसह नवीन एलईडी दिवे लावण्याचे १०.५४ कोटींचे काम करणार असून याच्या प्राथमिक कामाला सुरवात करण्यात आली आहे. नवी मुंबई हद्दीतून जामाऱ्या महामार्गावरील वाशी टोल नाका ते सी.बी.डी. बेलापूर हा भाग नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत येत असून सदर मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने व त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. परंतू आता ही दिवाबत्ती पालिकेकडे हस्तांतरीत झाल्यामुळे पालिकेची जबाबदारी वाढली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीत पावसामुळे कांदे भिजले ; ऐनवेळी पावसाचा धुमाकूळ, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट
वाशी उड्डाणपुल ते वाशी टोलनाका या मार्गावर केबलमध्ये बिघाड झाल्याने या भागातील पथदिवे एक दिवस बंद होते. परंतु या पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. महामार्गावरील दिवाबत्ती सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाचे अभियंता मिलींद पवार यांनी लोकसत्ताला दिली.