नवी मुंबई: वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या पामबीच मार्गावर काही ठिकाणी पथदिवे बंद राहत असल्याने वेगवान मार्गावर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या विद्युत विभागाने याबाबत खबरदारी घेण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. पालिकेने तत्काळ याबाबत देखभालविषयक आवश्यक तो बदल न केल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, एमआयडीसीमधील रस्ते व सायन पनवेल महामार्ग अशा अनेक मार्गांवर दिवाबत्तीसाठी पालिकेने पथदिवे लावले आहेत. पामबीच या नवी मुंबईतील वेगवान मार्गावरून सातत्याने वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. याच मार्गावरून वेगाने वाहने धावतात. त्यामुळे या मार्गावर अपघातही अधिक होतात. परंतु मागील काही दिवसांपासून याच पामबीच मार्गावर सारसोळे सिग्नल ते मोराज सर्कलपर्यंत पथदिवे बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत असून पालिकेच्या विद्युत विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पालिकाच अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
Woman killed five injured in horrific accident on Samruddhi Highway Nagpur news
समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी
Missing tempo driver, Narayangaon accident,
पुणे : नारायणगाव अपघात प्रकरणातील पसार टेम्पोचालक गजाआड, एसटी बसचालकही अटकेत
A portion of the divider bridge collapsed Kharegaon flyover
Video : खाडी पुलांच्या दुभाजकाचा भाग कोसळला; मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव उड्डाण पुलावरील घटना

हेही वाचा – नवी मुंबई : बेकायदा बांधकामांच्या दंडरकमेचे धनादेशही ‘बोगस’

नवी मुंबईतील किल्ले गावठाण ते वाशी आरेंजा कॉर्नर हा नवी मुंबईकरांच्या पसंतीचा मार्ग तरुणाईची वेगाने आवडती मोटर सफारी याच मार्गावरून अनेक जण करताना पाहायला मिळतात. ताशी ६० किमी वेगाचे या मार्गावर बंधन असताना अनेक वाहनचालक मात्र सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याचे पाहायला मिळते. याच देखण्या पामबीच मार्गावर वाहतूक पोलिसांचीही सातत्याने वेगवान वाहनावर नियंत्रणासाठी कारवाई सुरू असते. परंतु याच पामबीच मार्गावर सारसोळे सिग्नल चौक ते मोराज सर्कल या मार्गावर सकाळी पथदिवे बंद असतात. या भागात सूर्यादयाआधीच पथदिवे बंद झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या विद्युत विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

पामबीच मार्गावर सारसोळे चौक ते मोराज सर्कल या भागात पथदिवे बंद असतात. त्यामुळे या भागातील पथदिव्यांबाबत पालिकेने योग्य ती खबरदारी घेऊन पथदिवे सुरू राहतील याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिक करत आहे. याच मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही अधिक असते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. – मंगेश शिंदे, नागरिक

हेही वाचा – पनवेलमध्ये पथविक्रेत्यांना साडेदहा कोटींचे कर्जवाटप, पंतप्रधान स्वनिधी योजनेतून लाभ

सानपाडा मोराज सर्कल ते सारसोळे जंक्शन दरम्यानच्या पामबीच मार्गावरील पथदिव्यांची पाहणी केली जाईल. तांत्रिक अडचण असल्यास योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल. शहरातील पथदिवे स्वयंचलित आहेत. त्यातही तांत्रिक बिघाड आहे का हे तपासण्यात येईल. गरजेनुसार पथदिवे सुरू करण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. – संतोष मोरजकर, अभियंता, विद्युत विभाग

Story img Loader