उरण : तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालला आहे. शाळा, महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. तरीही या पदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याने अल्पवयीन शालेय विद्यार्थी नशेच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब तणावाखाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या व्यसनासाठी मुलांकडून घरात चोरी आणि पालकांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. यात काही पालकांनी मुलांना दिलेले अति आर्थिक स्वातंत्र्यही कारणीभूत ठरत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरणच्या आमसभेतही आवाज उठला आहे. दरम्यान, अंमली पदार्थाच्या तस्करीचे चक्र तोडून काढण्याचा प्रयत्न असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

तरुणांना अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोहीम राबविण्याचे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले. अमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. उरण पोलिसांनी नुकताच एका कारवाईत गांजा जप्त केला. यापुढे देखील गांजा चरस यांचे रॅकेट तोडून काढण्याला आमचे प्रधान्य राहील अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.

शाळा, कॉलेजच्या परिसरात मुझे सिगारेट, दाह, गुटखा यांना ची पडली आहेत. शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन शाळांना भेट देऊन मुलांमध्ये जनजागृती करावी, त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबतही समुपदेशन करण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी व्यक्त केले.

समुपदेशनाची गरज

व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्स वाटते, ताण-तणाव कमी होतो, असेही गैरसमज युवकांमध्ये आहेत. एकंदरीत शहरातील तरुणांचे हे नशेचे लोण आता ग्रामीण भागातही पसरत आहे. उरणातील शाळा, कॉलेज परिसरातील अडगळीच्या जागेत युवक-युवती नशा करताना दिसतात. हे रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलांचे समुपदेशन करण्यावर भर देण्याची मागणी नागरिक करत आहेत.