उरण : मच्छिमारांना  डिझेल पुरवठा करणाऱ्या खाजगी तेल कंपन्या व पेट्रोल पंपांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदाना प्रमाणे मच्छिमारांच्या सहकारी संस्थांनाही डिझेल मध्ये अनुदान देण्याची मागणी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. यात प्रति लिटर डिझेल प्रमाणे स्वतंत्र विक्रीत अनुदानाची मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन  निवेदन दिले आहे. यावेळी डिझेल तेल पुरवठा धारक कंपन्यांना निर्देश देण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही होण्यासाठी संस्थांनच्या वतीने  विनंती करण्यात आली आहे. तसेच पर्ससीन पध्दतीच्या मासेमारीत येणाऱ्या अडचणी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात मार्तंड प्रसन्न कुलाबा मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष अमोल रोगे, करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा,उरण नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष जयवीन कोळी हे उपस्थित होते.